फार्मर आयडी डाऊनलोड करणं खूप सोपं आहे. तुमच्या मोबाईलवरून अवघ्या काही मिनिटांत हे डिजिटल ओळखपत्र मिळवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- तुमच्या मोबाईलच्या ब्राउझरमधून अग्रिस्टॅकच्या अधिकृत वेबसाइटवर जा: https://apfr.agristack.gov.in/farmer-registry-ap/#/checkEnrolmentStatus.
- वेबसाइटवर तुमचा आधार क्रमांक टाका.
- जर तुम्ही आधी नोंदणी केली असेल, तर तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल. नोंदणी नसेल तर तिथेच आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि शेतजमिनीचा तपशील भरून नोंदणी करा.
- आधार क्रमांक सबमिट केल्यानंतर तुमचा युनिक फार्मर आयडी स्क्रीनवर दिसेल.
- ‘View Details’ वर क्लिक करा, मग ‘Generate PDF’ किंवा ‘Download PDF’ पर्यायावर क्लिक करून आयडी डाऊनलोड करा.
- ही पीडीएफ फोनमध्ये सेव्ह करा किंवा गरजेनुसार प्रिंट काढा.
ही प्रक्रिया मोफत आहे आणि फक्त इंटरनेट कनेक्शन आणि मोबाईल फोन लागतो.