Instant Loans Online: अर्ज करा आणि 4 तासात 50,000 रुपये होतील बँक खात्यात जमा

Instant Loans Online: तातडीच्या गरजांसाठी मिळवा त्वरित कर्ज. हे कर्ज मिळवण्यासाठी वेबसाइटवरून किंवा मोबाइलवरून अर्ज करावा लागतो

Instant Loans Online काय आहे?

हे एक प्रकारचे प्रमुख तातडीचे पर्सनल लोन आहे. या पद्धतीने कमी वेळेत कर्ज मंजूर होते, ज्यामुळे कर्ज अर्जदारांना अचानक खर्च किंवा आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्वरित पैसे मिळतात. हे कर्ज सर्व साधारणपणे बँका किंवा नॉन बँकिंग वित्तीय संस्थांकडून (NBFC) दिले जाते, ज्यात कमी कागदपत्रं आणि जलद कर्ज मंजुरी दिली जाते. या कर्जाची अर्ज प्रक्रिया आणि मंजुरी ऑनलाईन असल्यामुळे घरबसल्या सुलभ पद्धतीने कर्ज मिळवता येते .

या कर्जाचा व्याजदर | Instant loan Interest Rate

बँका आणि वित्तीय संस्था अर्जदाराच्या Credit स्कोअर, मासिक उत्पन्न, वयोमर्यादा आणि अर्जदाराची इतर आर्थिक स्थिती या आधारावर व्याजदर ठरवतात. यामध्ये काही प्रमुख बँका 10.49% पासून सुरू होणारे व्याजदर देतात, तर काही ठिकाणी हे दर 11% ते 30% पर्यंत जाऊ शकतात.

Instant पर्सनल लोनची वैशिष्ट्ये

कमी वेळेत मंजुरी – Instant Loan प्रामुख्याने प्री-अप्रूव्ड ग्राहकांसाठी देण्यात येतो, त्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया काही सेकंदांत होऊ शकते.

कोणतीही तारण आणि गॅरंटी ची गरज नाही – हे कर्ज बँकांसाठी असुरक्षित प्रकारात मोडते, त्यामुळे अर्जदारांना कोणतेही तारण जमा करावे लागत नाही.

त्वरित जमा– पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांच्या खात्यात कर्जाची रक्कम त्वरित जमा केली जाते.

सुलभ परतफेड कालावधी: काही Instant Loan साठी 5 वर्षांपर्यंतचा परतफेड कालावधी मिळतो त्यामुळे मासिक हप्त्याचा ताण कमी होतो.

Instant Online Loans देणाऱ्या प्रमुख बँका आणि वित्तीय संस्था

एचडीएफसी बँक: 40 लाख रुपयांपर्यंत कर्ज 6 वर्षांच्या परतफेडीसाठी देण्यात येते. प्री-अप्रूव्ड ग्राहकांना 10 सेकंदांत कर्ज मिळू शकते.

Tata Capital : मासिक 15,000 रु. उत्पन्न असणारे अर्जदार 35 लाखांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात, ज्यासाठी 10.99% पासून व्याजदर उपलब्ध आहेत.

IDFC First Bank : ही बँक अर्जदारांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज 5 वर्षांसाठी उपलब्ध आहे. या बँकेतून कर्ज मंजूर होण्यासाठी चांगला CIBIL स्कोअर असणे आवश्यक आहे. येथे कर्जाची रक्कम लवकर हस्तांतरित होते.

Kotak Mahindra Bank :25 लाखांपर्यंतचे कर्ज 3 सेकंदांत मंजूर केले जाते. 10.99% पासून व्याजदर सुरू होतो.

Axis बँक : Axis बँकेत Instant Loan अर्जाचा निर्णय 3 स्टेप्समध्ये होतो, ज्यात 25 लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते.

इतर निवडक वित्तीय संस्था

CreditBee – ही Instant Loan देणारी एक प्रमुख संस्था आहे. मोबाईल ॲप वरून अर्ज केल्यानंतर फक्त 10 मिनिटांत कर्ज मंजूर होते. तुम्ही 3 लाखांपर्यंत कर्ज वार्षिक 29% व्याजदरावर घेऊ शकता.

Money View: मनी व्ह्यू हा एक सुप्रसिध्द ऑनलाइन त्वरित कर्ज देणारा प्लॅटफॉर्म आहे. कमी CIBIL स्कोअर असला तरी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेद्वारे अर्ज करता येतो, 24 तासांत कर्जाची रक्कम बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येते.

IIFL Finance: या संस्थेमार्फत वय 23 ते 65 वर्षे असलेले अर्जदार सुमारे 5 लाखांपर्यंतचे Instant Online Loan घेऊ शकतात. ज्यावर 11.75% व्याजदर लागू आहे.

वर सांगितलेल्या बँका आणि संस्था मार्फत तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी Instant कर्जासाठी Online अर्ज करता येतो

Instant पर्सनल लोनचे फायदे

तातडीचा पर्सनल लोन घेतल्यास अनेक फायदे होऊ शकतात, विशेषतः त्या लोकांसाठी ज्यांना अचानक आर्थिक मदतीची आवश्यकता असते. याचे काही महत्त्वाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:

फक्त काही मिनिटांत मंजुरी: तातडीचा पर्सनल लोन एक वेगवान प्रक्रिया असते, आणि अनेक बँका तसेच वित्तीय संस्था काही सेकंदांपासून काही मिनिटांत कर्ज मंजूर करतात. हे खासकरून प्री-अप्रूव्ड ग्राहकांसाठी फायद्याचे ठरते.

पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया: आजकाल अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी आपल्या लोन प्रक्रियेला डिजिटल स्वरूप दिले आहे. त्यामुळे अर्जदारांना कोणतेही कार्यालय गाठण्याची आवश्यकता नसते; ते घरबसल्या लोनसाठी अर्ज करू शकतात, ज्यात कागदपत्रं ऑनलाइन अपलोड करता येतात.

कोणतीही तारण किंवा गहाण ठेवण्याची गरज नाही: तातडीचा पर्सनल लोन हा असुरक्षित प्रकाराचा असतो, त्यामुळे अर्जदारांना कोणतीही तारण ठेवण्याची आवश्यकता नाही. हे विशेषतः अर्जदारांसाठी फायद्याचे ठरते जे अडचणीत तारण ठेवण्यास अक्षम असतात.

सुलभ हप्ते आणि लवचिक परतफेडीची योजना: तातडीच्या पर्सनल लोनसाठी 1 ते 5 वर्षांचा परतफेड कालावधी दिला जातो, ज्यामुळे अर्जदारांना मासिक हप्त्याचा ताण सहन करण्यास मदत होते. काही बँका लोन घेणाऱ्यांच्या परतफेडीच्या क्षमतेच्या आधारावर विशेष हप्ते आणि योजना देतात.

कोणासाठी योग्य आहे तातडीचा पर्सनल लोन?

तातडीचा पर्सनल लोन त्या सर्वांसाठी उपयुक्त आहे ज्यांना तातडीच्या आर्थिक गरजेसाठी निधीची आवश्यकता आहे

मेडिकल आपत्कालीन गरजेसाठी : अचानक वैद्यकीय खर्चांसाठी हे कर्ज फायदेशीर ठरते, कारण कोणत्याही कागदपत्रांशी संबंधित त्रास न घेता वेगाने पैसे उपलब्ध होतात.

शिक्षणाशी संबंधित शुल्क भरायचे असल्यास हे कर्ज तातडीने मिळू शकते, ज्यामुळे अभ्यासावर होणारा ताण कमी होतो.

काही लोक त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी तातडीचा पर्सनल लोन घेतात.

Instant Loan मिळवण्यासाठी आवश्यक अटी आणि पात्रता

1. वय: अर्जदाराचे वय साधारणतः 21 ते 65 वर्षांदरम्यान असावे.

2. आर्थिक स्थिती आणि मासिक उत्पन्न: मासिक उत्पन्न 15,000 रुपये किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे असते. काही ठिकाणी अधिक उत्पन्नाची आवश्यकता असू शकते.

3. साधारणत: 700 किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर (CIBIL) असलेल्या अर्जदारांना तातडीचे कर्ज सहज मिळते. चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कमी व्याजदरावर कर्ज मिळण्याची शक्यता असते.

4. कामाचा अनुभव/व्यवसायाचा कालावधी: काही ठिकाणी अर्जदाराला नोकरीतील अनुभव किंवा व्यवसायाच्या कार्यकाळानुसार पात्रता निश्चित केली जाते.

तातडीचा पर्सनल लोन घेण्यापूर्वी लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

तातडीचा पर्सनल लोन घेण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे खूपच आवश्यक आहे

विविध बँका आणि संस्थांचे व्याजदर आणि फी तुलना करून कमी व्याजदरावर कर्ज निवडा.

कर्ज घेताना परतफेडीचा कालावधी आणि मासिक हप्त्यांचा आढावा घ्या. परतफेडीची योजना आणि हप्ते याचा सविस्तर अभ्यास करा.

अटी शर्ती काळजीपूर्वक वाचा : Instant Online कर्ज घेण्यापूर्वी कर्जाच्या अटी आणि शर्ती सविस्तरपणे वाचून नीट समजून घ्या. अटी शर्ती मध्ये काही लपलेल्या गोष्टी असू शकतात ज्यामुळे तुम्हाला अधिक रकमेची परतफेड करावी लागू शकते.

Leave a Comment